Home   |   Tell-A-Friend   |   Enquiry   |   Contact Us

 
 
The Resort
Tourist Guide
Facilities
Tariff
Photo Gallery
Location

 

Tourist Guide

विजयदुर्ग बंदर
   
विजयदुर्ग हे संपूर्ण कोकण किनारपट््टीवर एक महत्वपूर्ण आणि सुरक्षित बंदर आहे. विजयदुर्ग किल्ल्यानजीक हे बेदर आहे. ब्रिटीशांच्या आणि मराठयाच्या काध्हात या बंदरात फार मोठी वर्दळ होती. सुरक्षित आणि खोल वाघोटन खाडीमुळे गिर्ये गोदी आणि वाघोटण गोदी यांचा मालवाहतुकीचा उपयोग करून घेतला जात होता. पूर्वी या बंदरातून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूक होत असे. पणजी-मुंबई प्रवासी देवगड प्रमाणेच विजयदुर्ग बंदरातही जाता येता थांबत असे. परंतु मागील 20- 25 वर्षापासून या बंदरातून होणारी प्रवासी वाहतूक बंद आहे. मालवाहतुकीची इतर साधने उपलब्ध झाल्याने पूर्वीच्या मानाने मालवाहतूक बरीच कमी झाली आहे. सध्या या बंदरातून कोल्हापूर भागातील साखर कारखान्यातील लाखो टन ऊसाची मळी निर्यात होत आहे. शासनाच्या नवीन बंदर विकास धोरणानूसार हे बंदर आंरराष्ट्रीय बंदर म्हणून विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने हिंदुस्थान इनफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अन्ड इंजिनियरिंग्ज प्र.लि. या कंपनीशी करार केला आहे. या बंदरासाठी हजारो कोटी हजारांची गुंतवणूक होणार असून हे बंदर पूर्णपणे विकसित झाल्यानंतर प्रतिवर्षी 75 मिलियन कार्गो हाताळला जाणार आहे.
   
      © Galaxy Resort, Devgad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions