Home   |   Tell-A-Friend   |   Enquiry   |   Contact Us

 
 
The Resort
Tourist Guide
Facilities
Tariff
Photo Gallery
Location

 

Tourist Guide

सैतवडे धबधबा
   
नांदगांव-देवगड मार्गावर देवगड पासून सुमारे 27 कि.मी. अंतरावर तोरसोहे फाटा आहे. तेथून सैतवडे धबधबा 3 कि.मी. अंतरावर आहे. हा संपूर्ण रस्ता कच्चा आहे. तसेच याच मार्गावर नांदगांवपासून 13 कि.मी. अंतरावर शिरगांव आहे. तेथून हा धबधबा 6 कि.मी. अंतरावर आहे. येथून जवळच सैतवडे आणि पाडाघरवाडी अशी दोन गावे आहेत. म्हणून याला सैतवडे धबधबा किंवा पाडाघर धबधबा असे म्हणतात. जिल्हयाचा पर्यटन नकाशा तयार करताना या धबधब्याच्या आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे. जवळ नदी पलीकडच्या निसर्गरम्य परिसरात श्री गिरावळदेवीचे मंदिर आहे.

येथे भरपूर बारमाही पाणी आहे. उंच खडकामधून पडणारा हा धबधबा पर्यटकांना नेत्रसुख देणारा आहे. सभोवती असणा-या निसर्गरम्य परिसरामुळे या धबधब्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. पावसाळयात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने या कालखंडात जरा जपूनच आनंद लुटला पाहिजे. पावसाळयात येथील सौंदर्य पहाणे हा एक सुखद अनुभव असतो. पावसाळयात वाहणा-या नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे डोंगर फोडला जाऊन त्याचे दोन भागात विभाजन झाले आहे. इतर वेळेला प्रवाह बेताचाच असतो. सतत वाहणा-या पाण्यामुळे काळया खडकात सुंदर तळे निर्माण झाले आहे. धबधब्यासमोरील नदीचे पात्र रूंद आणि कमी खोलीचे असल्यामुळे त्यात स्नानाचा आणि पोहण्याचाही आनंद लुटता येतो.

येथील निसर्गरम्य परिसर पहाताच आपले भान हरपून जाते. तन-मनाला उल्हासित करणारा इथला गारवा अलौकिक शांतीचा, स्तब्धतेचा प्रत्यय देतो. येथे नेहमीच आसपासच्या शाळा वनभोजनासाठी येत असतात्ा. येथे चहापाणी, जेवण, रहाण्याची सोय नाही. मात्र स्वत:चे जेवण नेऊन किंवा जेवणाचे साहित्य नेऊन तेथे जेवण बनवून भोजन करून आनंद लुटण्यासारखे हे ठिकाण आहे.
   
      © Galaxy Resort, Devgad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions