Home   |   Tell-A-Friend   |   Enquiry   |   Contact Us

 
 
The Resort
Tourist Guide
Facilities
Tariff
Photo Gallery
Location

 

Tourist Guide

श्री लिंगेश्वर मंदिर, इळये
   
देवगड-कुणकेश्वर मार्गावर देवगडपासून 14 कि.मी. अंतरावर आमराईत निसग्र सौंदर्याने नटलेले इळये नावाचे गांव आहे. हे गाव थोडे उंचावर असल्याने त्याला इळयेसडा असेही म्हणतात. येथून कुणकेश्वर उत्तम रस्ता आहे. हा रस्ता इळये गावातूनच जातो. या गावापासून जवळच पण हमरस्त्यापासून थोडं एका बाजूला निसर्गरम्य, सुंदर व शांत परिसरात शिवभक्ताचे श्रध्दा स्थान असलेलं श्री लिंगेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालिन असल्याचे मानलं जात. श्री लिंगेश्वर आणि श्री कुणकेश्वर हे भाऊ असल्यांचही मानलं जातं.

मंदिराच्या परिसरात पुरातन काळातील विहीर असून या विहीरीला वर्षभर पाणी असतं. या मंदिराच्या मागच्या बाजूला दोन फूट अंतरावर एक गुहेसारखे भुयार आहे. हे भुयार कुणकेश्वर मंदिरापर्यंत गेल्याचे सांगितले जाते. आजही काही भावीक भुयाराच्या मुखावरून श्री देव कुणकेश्वराची पूजा करतात व तेथून केलेली पूजा कुणकेश्वरापर्यंत पाहोचते, अशी भाविकांची श्रध्दा आहे.

येथील नयनरम्य परिसर आणि मंदिराचे प्राचीन सुबक बांधकाम पाहून येथे येणारा प्रत्येक भाविक मंत्रमुग्ध होतो. कलाकुसरीचा उत्तम नमुना असणारे हे धार्मिक स्थळ प्रसिध्दीविना दुर्लक्षित राहिले आहे.
   
      © Galaxy Resort, Devgad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions