Home   |   Tell-A-Friend   |   Enquiry   |   Contact Us

 
 
The Resort
Tourist Guide
Facilities
Tariff
Photo Gallery
Location

 

Tourist Guide

श्री कार्तिक स्वामी मंदिर, हिंदळे
   
देवगड-आचरा-मालवण मार्गावर देवगड पासून सुमारे 26 कि.मी. अंतरावर अतिशय निसर्गसंपन्न असे हिंदळे गाव आहे. घनदाट झाडी, आंबा-पोफळीच्या बागा, हिरवेगार डोंगर आणि जवळच खाडी अशा सान्निध्यात् वसलेल्या या गावात बरीच लहान-मोठी मंदिरे आहेत. त्यापैकी कार्तिकीस्वामी हे एक प्रसिध्द पुरातन मंदिर आहे. देवळापर्यंत उत्तम डांबरी रस्ता आहे.

कार्तिकीस्वामीची मूर्ती पूर्णत: संगमरवरी असून तिची उंची 3 फूट आहे. कार्तिकीस्वामी हा गणपतीचा भाऊ. कार्तिकस्वामीला सहा तोंडे आहेत म्हणून याला षडानन असे म्हटले जाते. हिंदळे येथील मूर्ती पुढे 3 आणि मागे 3 अशी सहा तोंडाची आहे. हातही सहा असून प्रत्येक हातात वेवेगळी आयूधे आहेत. हिंदळे येथिल मूर्तीला संगमरवरी मोराचं वाहन आहे.

कार्तिक महिन्यात कृत्तिका नक्षत्रावर पौर्णिमा असते तेव्हा या देवतेच्या दर्शनाचा योग महत्वाचा मानला जातो. त्या दिवशी मुली व स्रियांना दर्शन घेण्याची परवानगी असते. इतर दिवशी नाही. या दिवशी दर्शन व पूजा केली तर बुध्दीमत्तेत वाढ होते आर्थिक स्थिती सुधारते अशी भाविकांची श्रध्दा आहे. स्कंद षष्ठी ही भाद्रपद शुध्द षष्ठी हा योगही महत्वाचा मानला जातो. या मंदिरात दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो.

पर्यटकांनी, भाविकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.
   
      © Galaxy Resort, Devgad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions